जिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जाळ्यात
- by Adarsh Maharashtra
- Aug 13, 2020
- 792 views
डोंबिवली:(श्रीराम कांदू) मटका किंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी गुजरातमधुन मुख्य सूत्रधार धर्मेश उर्फ नन्नु शहा याला ताब्यात घेतले आहे. अनेक गुन्हे दाखल असलेला धर्मेश हा कुख्यात डॉन छोटा राजनचा हस्तक असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली असली तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत मौन पाळले आहे. 3 ऑगस्टला ठाणे खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज उर्फ जपान या शुटरला अहमदाबाद येथून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार देखील गुजरातमधुनच ताब्यात घेतल्याने ठाणे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 31 जुलैच्या रात्री जिग्नेश ठक्करची कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काम आटोपुन कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. जिग्नेशचे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर भागात अनेक पत्याचे क्लब असून तो क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणूनदेखील काम करीत होता. त्याचा बालपणीचा मित्र धर्मेश उर्फ ननू शहा हा त्यास या धंद्यात साथ देत होता.गुंड प्रवृत्तीच्या धर्मेश याचे धंद्यातील पैशावरून जिग्नेश सोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला अन येथूनच दोघा मित्रांमध्ये कट्टर दुष्मनीस सुरवात झाली. धर्मेश याचा मित्र चेतन पटेल आणि जिग्नेश मध्ये 29 जुलै रोजी हाणामारी झाली होती. आपला दबदबा रहावा यासाठी धर्मेशने जिग्नेशला ठार करण्याचा कट रचला. त्यानुसार धर्मेशने जयपाल आणि इतर दोघा तिघा साथीदारांची मदत घेत जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सुरू होता. आता यातील प्रमुख आरोपी धर्मश शहा याला पोलिसांनी गुजरातमधुन ताब्यात घेतले.धर्मेश उर्फ नन्नू शहा हा छोटा राजनचा मुख्य हस्तक असुन जिग्नेशच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी धर्मेश स्वत: होता, त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या 5 झाली असून पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासात मोठे यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम