कल्याण-डोंबिवलीच्या लोकांना बसच्या अभावामुळे नोकरदारांचे हाल,प्रवासाकरिता तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ
- by Adarsh Maharashtra
- Aug 13, 2020
- 2665 views
डोंबिवली:(श्रीराम कांदू)
करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनची सेवा बंद असली तरी नोकरदार वर्गाला कामावर जाणे आता भाग झाले आहे. परंतु कल्याण-डोंबिवली तुन मुंबईला जाणाऱ्या बसचा अभाव असल्याने नागरिकांना बस पकडण्याकरिताच तब्बल एक ते दोन तास वाट पाहावी लागत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातून मोठय़ा प्रमाणात अनेक नागरिक कामानिमित्त मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. करोनामुळे राबवण्यात आलेल्या टाळेबंदी नियमांना शिथिल करत प्रशासनाकडून व्यवसायाला चालना देण्यावर जोर दिला जात आहे. त्यामुळे आता अनेक उद्योगधंदे आणि कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. दळणवळण करण्याकरिता रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे बस सेवेवर संपूर्ण ताण निर्माण झाला आहे. त्यात बसमध्ये प्रवास करण्याकरिता २५ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु कल्याण डोंबिवली शहरातून जाणाऱ्या प्रवाशांना बसची कमतरता भासत आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने बीईएसटीच्या बस गाडय़ा सुटतात. त्यात मुंबई , नवी मुंबई,ठाणे आणि खाजगी बसेस आणि गाड्या जातात. परंतु यात मोठय़ा प्रमाणात गाडय़ा ठरावीक ठिकाणा पर्यंतच जात असून त्यापुढे केवळ बस जाते. परंतु या बस गाडय़ा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे रोज नागरिकांना बस पकडण्याकरिता लांबच लांब रांग लावावी लागत आहे. तरीदेखील बस मिळत नसल्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना उन्हा—पावसात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाकडून दखल घेऊन रेल्वे सेवा सुरू होईपर्यंत बस गाडय़ात वाढ करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
करोनाचे संकट डोक्यावर असतानादेखील कामे सुरू करण्यात आली आहेत. परंतु बस उपलब्ध नसणे तसेच सामाजिक अंतरचे पालन न होणे अशा अनेक समस्या असताना नागरिकांना प्रवास करावा लागत आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम