
गोकुळाष्टमी निमित्त भांडुपमध्ये विहिंपतर्फे घरोघरी गायीचे दूध वाटप
- by Reporter
- Aug 12, 2020
- 520 views
भांडुप (शेखर भोसले) : विश्व हिंदू परिषद दिवस आणि गोकुळाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भांडुपमधील विविध भागांमध्ये आज विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन गायीच्या दुधाचे वाटप केले. गोकुळात गायींच्या सहवासात वाढलेल्या श्रीकृष्णाला दूध व लोणी खूप आवडायचे व म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भांडुप परिसरातील नागरिकांना गायीच्या दुधाचे वाटप करून विश्व हिंदू परिषदेने विहिंप दिवस साजरा केला, असे यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या सांगितले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे ओमप्रकाश मिश्र, सुभाष दुबे, विशाल चव्हाण, शत्रुघ्न गुप्ता, सुनील यादव, मुकुंद नरसे, सोनू कश्यप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर