वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात डफली बजाओ आंदोलन

मुंबई (जीवन तांबे) : सरकारने लॉक डॉउन उठवून एसटी बेस्ट आणि रेल्वे सेवा लवकरात सुरू करावी या मागणी करिता वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण मुंबईभर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.
 
मुंबईत कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असल्याने राज्य सरकारने २५ मे पासून लॉकडॉउन सुरू केला. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तर काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर दुकाने, उपहारगृह बंद झाल्याने कित्येकांनवर उपासमारीची वेळ आली.
एसटी, बेस्ट, रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी या मागणी करिता लॉकडाऊनला विरोध करत राज्य सरकारच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई शहरात ठिकठिकाणी डफली बजावो आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधत आंदोलन केले.

वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने , महाराष्ट्र अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे डफली बजावो आंदोलन घेण्यात आले होते.

चेंबूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यनाजवळ तालुका अध्यक्ष हरीश काशीद यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई विभागातील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संबंधित पोस्ट