गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ कोरोना रुग्णांची नोंद २५६ रुग्णांचा मृत्यू
- by Adarsh Maharashtra
- Aug 11, 2020
- 467 views
मुंबई, ११ ऑगस्ट :-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के इतका आहे.
राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 इतकी झाली आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 68 हजार 435 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 68.79 टक्के एवढा झाला आहे.
सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 18 हजार 306 जणांचा बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के इतका आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम