गणेशोत्सवाच्या आधी डोंबिवलीतील खड्डे बुजवणार,संयुक्त बैठकीत एमआयडीसी, केडीएमसी आणि पिडब्लूडीच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन

डोंबिवली : (श्रीराम कांदूू) गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डोंबिवलीतील खड्डे हे जीवघेणे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीणचे आमदार प्रमोद तथा राजू पाटील यांनी केडीएमसी आणि एमआयडीसी आणि पिडब्लूच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. निवासी विभागासह कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात असलेल्या गावांमधील खड्डे बुजवले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह डोंबिवली निवासीभागातील नागरिकांची आठवडाभरात खड्यातून मुक्तता होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी तातडीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत आश्वासन दिले.

निवासी विभागासह आसपासच्या गावांतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होणार आहे. त्यामुळे यंदा ग्रामीण भागासह निवासी विभागातील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना आमदार राजू पाटील यांनी संयुक्त बैठकीत केल्या. डोंबिवलीच्या एमआयडीसी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या आधी खड्डे बुजवले जाणार असल्याचे आश्वासन दिले. या बैठकीला एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता के. एस. भांगरे, कार्यकारी अभियंता संजय ननावरे कार्यकारी अभियंता, उपअभियंता एस. के. कळसकर, तर केडीएमसीचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे , उप अभियंता किरण वाघमारे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता राजेश वसईकर, पिडब्लूडीचे  प्रितेश पराळे, चव्हाण यांच्यासह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रीपुल-माणकोली पुलांना हेरिटेजचा दर्जा द्यावा : कल्याण-डोंबिवलीकरांच्या पुलकोंडीमुळे झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे. त्यामध्ये कल्याणच्या पत्रीपुल, दुर्गाडी पूल, तर डोंबिवलीतील कोपर आणि माणकोली पूल यांची कामे अत्यंत कासवगतीने सुरू आहेत. तर नवीन पलावा पुलाचे फक्त पिलर बांधून सोडून दिले आहेत. त्यामुळे सर्वत्र पुलकोंडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ताधाऱ्यांनी सतत नव-नव्या तारखा देण्याचा सपाटा लावला असल्याची टिका करताना आमदार राजू पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना असता आमदार यांनी पत्रीपुल आणि माणकोली पुलाला हेरिटेजचा दर्जा द्यावा, असा टोला लगावला.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट