यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा भाजपाच्या वतीने निषेध,यशोमती ठाकूर यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करावी -निवेदिता चौधरी

अमरावती (प्रतिनिधी) : सरकारी कार्यालयात अधिकारी कर्मचारी काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे करत नसेल तर कार्यालयात दंगा करा या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला आहे. सोलापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना सरकारी अधिकारी व कर्मचारी काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे करीत नसेल तर कार्यालयात दंगे करा व कार्यालयात जातांना नेहमी पाच दहा जण सोबत ठेवत चला त्याशिवाय अधिकाऱ्यांवर रुबाब पडत नसतेअसा सल्ला त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे.अमरावती जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना यशोमती ठाकूर यांच्या दंगा पटर्नचा  त्रास दररोज भोगावा लागत ठाकूर मंत्रीपदावर असल्याने  कुणी याच्या विरोधात बोलण्यास धजावत नसल्याने अधिकारी कर्मचारी यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालकमंत्री म्हणून ठाकूर यांचा प्रचंड दबाव आहे असा आरोप निवेदिता चौधरी यांनी केला आहे.सध्या कोरोनामुळे सरकार सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगत असतांना यशोमती ठाकूर कार्यकर्त्यांना दंगे करा,जमाव जमवा असे सल्ले देत असल्याने यशोमती ठाकूर यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या योग्य त्या कलमानव्ये कारवाई करावी अशी मागणी केली आहे.अमरावती जिल्ह्यातील प्रशासन सध्या ठाकूर यांना याच कारणासाठी कंटाळले आहे.असा आरोप निवेदिता चौधरी यांनी केला आहे

संबंधित पोस्ट