कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या डॉक्टरांसाठी शासनाने स्वतंत्र उपचार केंद्रे मुंबई आणि इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तातडीने सुरू करण्याची मागणी

मुंबई (सुनिल गायकवाड) : कोविड १९ च्या संक्रमण काळात अत्यावश्यक सेवा म्हणून खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत असा आदेश शासनाने काढला.त्यानुसार खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व आयुष डॉक्टरांनी शासनास सहकार्य करून आपले दवाखाने सुरू ठेवले.परंतु दुर्दैवाने आता डॉक्टरांनाच कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे.अशा वेळी डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात दाखल होऊन स्वतःच्या खर्चाने उपचार करून घ्यावे लागत आहेत.कोरोना काळात डॉक्टरही आर्थिक अडचणीत आहेत.तरी कोरोना बाधित झालेल्या डॉक्टरांसाठी शासनाने स्वतंत्र उपचार केंद्रे मुंबई व इतर जिल्ह्याचा ठिकाणी तातडीने सुरू करावीत आशी मागणी डाँक्टर अनिल साळुंके डॉ.दिलीप कदम डॉ.हेमत अडसुळ डॉ.संजय गोसवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सह शिवसेनेच्या उपनेत्या निलमताई गो-हे आमदार कपिल पाटिल यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान : रुग्णाना सेवा देत असताना कोरोना संसर्गामुळे ज्या आयुष डॉक्टरांचे निधन झाले आहे त्या  डॉक्टरांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे व अशा कुटुंबियांमधील एका सदस्याला शासकीय सेवेत सामिल करून घ्यावे.आशी मागणी सुध्दा या निवेदनात केली आहे.

संबंधित पोस्ट