जागतिक आदिवासी दिनानिमित्त रंगले ऑनलाइन कवी संमेलन
कवितेतून आदिवासी संस्कृती जपण्याचा प्रयत्न
- by Reporter
- Aug 10, 2020
- 671 views
भिवंडी(सुनिल गायकवाड) : ९ ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यातील माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त झूम अँपच्या माध्यमातून ऑनलाइन कवी संमेलन घेण्यात आले.
यावेळी आदिवासी संस्कृती जपण्याचा व आदिवासी संस्कृतीला उजाळा देण्याचे काम कवितेच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक विजयकुमार भोईर होते. यावेळी आदिवासी संस्कृती व लढा, तसेच आदिवासी जीवनावर कविता सादर करण्यात आल्या. त्यात नरेश जाधव, अड. प्रज्ञेश सोनावणे, भटू जगदेव, नवनाथ रणखांबे, अशोक कांबळे, अजिंक्य म्हस्के, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, मारुती कांबळे, विष्णू राघो खांजोडे, राष्ट्रपाल काकडे, विजयकुमार भोईर, अड. श्रीकृष्ण टोबरे, रविंद्र आडके यांनी स्वरचित कविता सादर करून प्रबोधन केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीला उजाळा मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही कवितेच्या माध्यमातून कवितांचा कार्यक्रम ऑनलाइन घेऊन आदिवासी संस्कृतीची कवितेतून मांडणी केली आहे, असे कवी संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार भोईर यांनी बोलतांना सांगितले
रिपोर्टर