भाजप आमदार 'कोरोना'च्या विळख्यात, कुटुंबातील ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
- by Reporter
- Aug 10, 2020
- 685 views
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप प्रदेश सरचिटणीस आणि आमदार सुजितसिंह ठाकुर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील ६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
३ ऑस्टपासून बाहेर मी कोणाचाही संपर्कात आलो नाही. मंगळवारी ४ ऑगस्टला कुटुंबातील सर्वांची रॅपीडड अॅन्टीजन टेस्ट झाली. कुटुंबातील ६ सदस्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी केली आहे. मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची पृकृती चांगली आहे. लक्षणे नाहीत. काळजी घेतो आहे. आपणही आपली व परिवाराची काळजी घ्यावी' असे त्यांनी नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करत फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे. सध्या त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.

रिपोर्टर