पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचे वेतन

जळगाव( प्रतिनिधी) कोरोना पार्श्वभूमीवरील  लाॅकडाऊनच्या काळात संपूर्ण देशात गोरगरीब जनतेला मोठा आर्थिक फटका बसला असताना जळगाव येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी त्यांचे एक‌ महिन्याचे वेतन कोरोनाला रोखण्याची उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे विनंती पत्र पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिले. सध्याच्या कोरोना संकट काळातल्या बिकट परिस्थिती मध्ये गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी प्रत्येकाला निसर्गाने सिध्द करण्यासाठी वेळ दिली आहे , म्हणून तन मन धन अर्पण करून आपल्या परीने सरकारच्या पाठीशी सदैव उभे राहिले पाहिजे . या भावनेने फुल ना फुलाची पाकळी समजून , मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही मदत केली आहे , असे मनोगत पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी व्यक्त केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट