शन्नांच्या अर्धांगिनी अंजली नवरे यांचे निधन

डोंबिवली (श्रीराम कांदू) : ज्येष्ठ साहित्यिक शं. न्ना. नवरे यांच्या विविध प्रकारच्या लेखनाचा पहिला वाचक व श्रोता ही भूमिका बजावणाऱ्या अंजली नवरे यांचे शनिवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. गेल्या ५-६ वर्षांपासून त्या आजारी होत्या. डोंबिवलीतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ऍड. अरुण नवरे, सून ऍड. जान्हवी अरुण, वृंदा मकरंद, नातू डॉ. शंतनू, नात डॉ. राधिका असा परिवार आहे. सर्वसामान्यांच्या चाकोरीतील आयुष्यात आपल्या साहित्याने आनंदाचे झाड फुलवणारे ज्येष्ठ साहित्यिक शंकर नारायण तथा शन्ना नवरे यांचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले होते. तर उत्तम वाचन व अचूक नोंद करणे हा अंजली यांचा गुण होता. त्यांच्या पार्थिवावर शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित पोस्ट