रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णा करिता स्वेच्छा रक्तदान शिबिर आयोजित करून १२३ वा रक्तदान शिबिराचा विक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : कामगार राज्य विमा योजना रुग्णालयातील रक्तपेढी विभागा करिता सेवा निवृत्ती नंतरही कार्यरत असलेले प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ व रक्तदान सहाय्य केंद्राचे संचालक श्रीधर बुधाजी देवलकर लॉकडाऊनचा विचार न करता सोशियल डिस्टिंगसिंगचा नियम पाळुन स्वतः देवलकर यांनी रक्तदात्यांचे रक्त घेऊन शिबिर यशस्वी केले,

कोरोना बाधित रुग्णाना रक्तकुपी मिळाली पाहिजे त्यांचे जीव वाचले पाहिजे हीच भावना ठेऊन रक्तदान जीवनदान रक्तदान श्रेष्ठ दान हे घोष वाक्य वास्तवात करून दाखविले,

आपण शासनाचे ऋणी आहोत या जाणिवेतून दरवर्षी स्वेच्छा रक्तदात्याचा गौरव करतात व रक्तदान क्रिकेट स्पर्धा आयोजित करून त्याना प्रोत्साहन देतात, कथा,कविता,गाणी लिहिण्याची आवड असून एक उत्तम क्रिकेट खळाडू म्हणून त्यांची ओळख आहे अश्या हरहुन्नरी व सर्वगुण संपन्न देवलकर याना शुभेच्छा देताना त्यांच्या पवित्र कार्यास सलाम

करताना आपल्या तोंडून एकच वाक्य निघेल देवलकर रक्तदानाच्या विकेटवर १२३ नाबाद खेळत आहात असेच खेळत रहा असेच खेळी करत रहा

संबंधित पोस्ट