मुलुंडच्या टी वॉर्डने केला ५००० कोरोना रुग्नांचा टप्पा पार! रुग्ण संख्या होत आहे कमी
- by Adarsh Maharashtra
- Aug 07, 2020
- 842 views
मुलुंड :(शेखर भोसले)मुलुंड विभागाचा समावेश असलेल्या पालिकेच्या टी वॉर्डने कोरोनाबाधित रुग्नांचा ५००० चा टप्पा आज पार केला. टी वॉर्डने सादर केलेल्या कोरोना रुग्नांच्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात ३४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण रुग्नांची संख्या ५०२५ झाली आहे. यापैकी ५९७ रुग्णावर उपचार चालू असून ४१२९ रुग्ण बरे झाले आहेत तर २६५ रुग्नांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक दिवशी ८० च्या पुढे रुग्णसंख्या आढळत असलेल्या मुलुंडमधील कोरोनाबाधित रुग्नांचे प्रमाण कमी होत असून गेल्या आठवड्यात रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून आले आहे व आज फक्त ३४ कोरोनाबाधित रुग्ण मुलुंडमध्ये आढळून आले आहेत. सध्या आढळत असलेले रुग्ण हे इमारतीत राहणारे असून स्लममधील रुग्णसंख्या अगदीच नगण्य आहे.
कोरोनापासून बचावासाठी नागरिक घेत असलेली स्वतःची संपूर्ण काळजी, यामुळेच हे प्रमाण कमी झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले असून यापुढेही नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करत गर्दी न करता, मास्क परिधान करून व सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर केला तर कोरोना नक्कीच हद्दपार होईल असे या अधिकाऱ्याने सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम