विसर्जन आपल्‍या दारी ' केडीएमसीची संकल्‍पना

डोंबिवली (श्रीराम कांदू) : कोरोना साथीच्‍या आपत्‍कालीन परिस्थितीत नागरिकांच्‍या सोईकरीता विसर्जन आपल्‍या दारी ' ही संकल्‍पना यावर्षीही राबविणार, अशी माहिती पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिली.  महापालिका क्षेञातील पोलिस अधिकारी , महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त , महापालिका उपायुक्‍त, तहसिलदार तसेच प्रभागक्षेत्र अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांचे समवेत गणेश उत्‍सवाच्‍या प्राथमिक तयारीबाबत आयोजिलेल्‍या ऑनलाईन मिटिंग मध्‍ये त्यांनी ही माहिती दिली. कोरोना साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्‍या गणेशोत्‍सवात विसर्जन स्‍थळे तसेच शासनाच्‍या गाईडलाईन्‍स प्रमाणे मंडपांची उभारणी व त्या अनुषंगाने  बैठकीमध्‍ये चर्चा झाली.

कोकणात गणपतीसाठी जाणारे अनेक लोक यावर्षी कोकणात न जाता त्‍यांच्या राहत्‍या घरात गणपती आणणार असल्‍यामुळे खाजगी घरगुती गणपतींची संख्‍या वाढु शकणार असल्‍याची शक्‍यता डोंबिवलीचे सहा. पोलिस आयुक्‍त  मोरे यांनी व्‍यक्‍त केली. सार्वजनिक गणपती मंडळांच्‍या विसर्जनासाठी सॅनिटायझेशनची आवश्‍यकता लागेल. त्‍याचप्रमाणे स्वयंसेवकही तयार ठेवावे लागतील, त्‍यासाठी पूर्व तयारी करणेबाबत पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना निर्देश दिले.

यावर्षी देखील गणेशोत्‍सव मंडळांच्‍या लागणा-या परवानगीसाठी महापालिकेच्या एस.ओ. पी. प्रमाणे एक खिडकी योजना सर्व संबंधित पोलिस स्‍थानकांमध्‍ये कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्‍त यांनी उपस्थितांना दिली. यावर्षीच्‍या गणेशोत्‍सवासाठी शासनाच्या गाईड लाईनचे पालन करून गणेशोत्‍सव साजरा करणेबाबत सर्व गणेश मंडळांच्‍या पदाधिका-यां समवेत शुक्रवारी, दि. ०७/०८/२०२० रोजी  दुपारी १२.३० वाजता ऑनलाईन मिटिंग आयोजित करण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले



संबंधित पोस्ट