बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीतर्फे,गरजू पालकांना जीवनावश्यक कीटचे वाटप

मुंबई : कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर संक्रात आली आहे.  अडचणीत सापडलेल्या या पालकांना मदतीचा  हात मिळावा यासाठी बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक  समितीच्या विद्यमाने शिवसेना खासदार अनिल देसाई व शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या सहकार्यातून गरजू पालकांना जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. 

या सर्व जीवनावश्यक कीट गरजू पालकांबरोबर  साईदत्त व अमरज्योती ट्रँव्हल्सच्या गरजू कर्मचा-यांना देण्यात आल्या.बालमोहन पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर, पालक समितीचे कार्याध्यक्ष दिपक घाडिगांवकर, सरचिटणीस  साईनाथ गवळी,खजिनदार सौ.दिपा राणे व सौ.सुवर्णा माळी ,उपाध्यक्ष संदेश पुरळकर व भालश्चंद्र मोरे तसेच सहचिटणीस सौ.संगिता सावंत व विलास इंगवले आदींनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  विशेष परिश्रम घेतले. यावेळी अडचणीत असलेल्या मिडियातील  श्रमजीवी  पत्रकार व वृत्त  छायाचित्रकार यांनाही जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले.

शाळकरी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या पालक संघटनेने करोनाच्या या संकटकाळात अडचणीत असलेल्या पालकांबरोबर अन्य घटकांना  मदतीचा हात देण्याचा केलेला प्रयत्न हा स्तुत्य उपक्रम असल्याची भावना पालकवर्गात व्यक्त केली जात आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट