जिम सुरू करण्यास परवानगी द्या,डोंबिवली जिम ओनर्स असोसिएशनची राज्य सरकारकडे मागणी
- by Adarsh Maharashtra
- Aug 04, 2020
- 1052 views
डोंबिवली :(श्रीराम कांंदू) लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच घटकांचे नुकसान झाले आहे. मिशन बिगेन अंतर्गत राज्यातील स्थिती पूर्वपदावर येत असताना अटी व शर्तींच्या आधारे जिम व्यवसायही सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आता डोंबिवली जिम ओनर्स असोसिएशनच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या संदर्भात निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार असल्याचे डोंबिवलीत जिम ओनर्सचे अध्यक्ष निखिल अनम यांनी सांगितले.
डोंबिवली जिम ओनर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी डोंबिवलीत सर्व जिम ओनर्सने एकत्रित येऊन राज्य सरकारकडे मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निखिल अनम, उपाध्यक्ष राहूल सिन्नरकर, सेक्रेटरी योगेंद्र भोईर, आदी पदधिकाऱ्यांसह निलाक्षी कुकीयन, शिवाली शहा, करण भगत, राष्ट्रीय शरीरसौष्ठवपट्टू निळकंठ पाटील व अनेक जिम ओनर्स उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने शासनाच्या नियमानुसार चालत आहेत. परंतू आता पाच महिन्यानंतर काही व्यावसायिकांना रिलिफ देत शासनाने अटी शर्थींच्या आधारे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिम सुरु करण्यासही महाराष्ट्र सरकार ने परवानगी द्यावी. जिम सॅनिटाईज करणे, शारीरिक अंतर राखणे यांसारखे नियम आम्हालाही आखून द्यावेत. परंतु व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. अनेक जिम ओनर्स आज आर्थिक अडचणीत आले आहेत. जिमचा व्यवसाय या वर्षाच्या सुरूवातीलाच लॉकडाऊनमुळे बंद झाला. वास्तविक जिमचे भाडे, लाईट बिल, कर्जाचा हप्ता, इत्यादी थकले आहेत. यामध्येही काही सूट देण्यात यावी, अशी मागणीही आम्ही शासनाला केली असल्याचे निखिल अनम यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की काही व्यावसायिकांनी नुकतिच जिम सुरु केली होती, तर काहींचे पूर्ण घर यावरच चालत आहे. त्याचप्रमाणे ओनर्ससुद्धा आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत. यावेळी उपाध्यक्ष राहूल सिन्नरकर यांनी असाही मुद्दा मांडला की फिटनेस ही एक बेसिक नेसेसिटी असल्या जीएसटीचे रेट्स सुद्धा 18 % ऐवजी 5 % केले पाहिजे. जिममध्ये येणारे काही सभासद असेही आहेत की काही व्याधींमुळे त्यांना दररोज व्यायाम/वर्कआऊट करणे आवश्यक असते. या सर्वांचेच लॉकडाऊनच्या दिवसांत हाल होत आहे. जिममध्ये वर्कआऊट केल्याने प्रकृती नक्कीच चांगली राहील व आलेल्या संकटावर मात करण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे समाजातील इतर घटकांप्रमाणेच जिम ओनर्सचाही विचार करुन सरकारने जिम सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी आम्ही सरकारला जिम ओनर्स अससोसिएशनच्या कमिटीने केल्याचे अध्यक्ष निखिल अनम यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम