जिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणातील शुटरला बेडया ठोकणाऱ्या पथकाला रोख पारितोषीक
- by Adarsh Maharashtra
- Aug 04, 2020
- 983 views
डोंबिवली:(श्रीराम कांदू) मटका किंग जिग्नेश ठक्करच्या मुख्य शुटरला अवघ्या तीन दिवसात गुजरात येथून अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास करून शुटरला बेड्या ठोकल्याबद्दल गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी वैयक्तिकरित्या विशेष कौतुक करत पथकाला प्रत्येकी पाच हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे. आर्थिक वादातून शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जिग्नेशचा बालपणीचा मित्र धर्मेश उर्फ ननू शहा याचे धंद्यातील पैशावरून जिग्नेशसोबत बिनसले होते. या वादाचे पर्यवसान हाणामारी पर्यंत पोहचल्याने धर्मेशने जिग्नेशला ठार करण्याचा कट रचला. त्यानुसार धर्मेशने जयपाल आणि इतर साथीदारांची मदत घेत 31 जुलैला रात्री जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली होती. या कटातील मुख्य शुटर जयपाल फरार होता. दरम्यान याप्रकरणाचा समांतर तपास करणाऱ्या खंडणी विरोधी पथकाने अहमदाबाद येथे लपुन बसलेल्या जयपाल उर्फ जपान यास अटक करून महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. ही यशस्वी कामगिरी बजावणारे पोलीस नाईक प्रशांत भुरके, संदीप भांगरे, हेमंत महाले आणि बाळू मुकणे आदी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त देवराज यांनी प्रत्येकी 5 हजारांचे पारितोषीक जाहीर केले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम