अखिल मराठा फेडरेशनचा तीव्र निषेध;छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कर्नाटक सरकारने पाठ्यपुस्तकामधून वगळला
- by Adarsh Maharashtra
- Aug 04, 2020
- 2601 views
कर्नाटकामधील विजापूरच्या आदिलशाही राजवटीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवट केला आणि रयतेस धर्मांतर होण्यापासून वाचविले होते.कर्नाटकात महाराजांनी पराक्रम गाजवला आहे. शिवाजी महाराजांचे जगातील पाहिले शिल्प हे धारवाड जवळील यादवाड येथे यासाठीच बांधले गेले आहे. ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त भारतातील जनतेचेच स्फूर्तीस्थान नसून जगभरात आदरणीय आहेत. महाराजांनी मुसलमानी,मोघली आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण केले होते.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शाळांच्या अभ्यासक्रमांमधून पाठ्यपुस्तकां मधून कर्नाटक सरकारने नुकत्याच जाहीर केल्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्यात आला आहे".
अखिल मराठा फेडरेशन ही देशभरातील मराठा संस्थाचे प्रतिनिधित्व करीत असून छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. कर्नाटक सरकारच्या वरिल निर्णयाचा अखिल मराठा फेडरेशन तीव्र निषेध करीत आहे.
अखिल मराठा फेडरेशन या पत्राद्वारे आपणास विनंती करीत आहे कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तका मधून वगळण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास प्रत्येक पिढीसाठी स्फूर्तीदायक आहे व त्याचा योग्य सन्मान राखला गेलाच पाहिजे....!
आपल्या सरकारच्या या अन्यायी निर्णयामुळे देशभरातील शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आपण यात जातीने लक्ष्य घालून सरकारचा निर्णय रद्द करावा.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम