वरिष्ठ नागरिकांचा हृद्य सत्कार,वरिष्ठांच्या अनुभवाचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करावा - डॉ. जगन्नाथराव हेगडे
- by Adarsh Maharashtra
- Aug 04, 2020
- 1124 views
मुंबई: वरिष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा घरातील मंडळींनीशिवाय इतर क्षेत्रातदेखील उपयोग करून घ्यावा तसेच समाजहित साधावे आणि आपेल जीवन समृद्ध करावे, असे विचार माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी व्यक्त केले. काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, छत्र्या आदींचे वाटपही करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचाही यात सहभाग होता.
यावेळी राजकुमार गुप्ता (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), भावना शहा (एरिया लीडर) तसेच प्रसाद पानवलकर (व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) तसेच राहुल हेगडे, डॉ. वर्षा राठोड, दीपक दळवी, विलास डांगे यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी विद्यालयात कोरोना प्रादूर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवून वरिष्ठ नागरिक जमले होते. राजकुमार गुप्ता तसेच भावना शहा यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
वरिष्ठ नागरिकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. यात आरोग्य सेवा, सामाजिक कार्य तसेच अन्य बाबींचाही समावेश असतो. वरिष्ठ नागरिक हे समाजाचे देणे असून त्यांचा आदर व्यक्त करणे आपले सामाजिक कर्तव्य असून यापुढील काळातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, असेही डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम