
एक आगळा वेगळा कलावंत...किशोरकुमार.
- by Reporter
- Aug 03, 2020
- 354 views
मुंबई (भारत कवितके) : मोहम्मद रफी,मुकेश,व किशोरकुमार हे तीन महान समकालीन गायक होऊन गेले.तिघांनाही प्रचंड प्रमाणात प्रसिध्दी मिळाली.तिघे ही खूपच भाग्यशाली समजले जात.एकमेकांबद्दल
व्देष,मत्सर,हेवा,स्पर्धा तर कधीच नसायची.पण एकमेकांच्या कला गुणांची प्रशंसा करून एक दुसर्याला प्रोत्साहन दे असत.आज जरी हे तीनही महान कलाकार जीवंत नसले तरी त्यांची जीवंत आहे, त्यांच्या गायनाने,अभिनयाने,व माणुसकीनेच.
किशोरकुमार मूळचे मध्य प्रदेशातील खांडवा या गावचे,त्यांचे त्यांच्या गावावर खूपच प्रेम होते.किशोरकुमारचे मूळ नाव आभासकुमार गांगुली,त्यांचा जन्म ४ आँगस्ट १९२९ मधे झाला.त्यांचे थोरले बंधू प्रसिध्द अभिनेता अशोककुमार यांना ही त्या काळी प्रचंड प्रसिध्दी मिळाली होती.त्यानंतर दुसरे बंधू अनुपकुमार यांना मात्र अभिनय क्षेत्रात फारसा आपला प्रभाव टाकता आला नाही.' चलती का नाम गाडी ' या चित्रपटात किशोरकुमार,अशोककुमार व अनुपकुमार या तिन्ही बंधूनी धम्माल उडवून दिली होती.सोबत मधुर,मधाळ हास्याची,दिलखेचक नजरेची सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला होती.
किशोरकुमार यांनी चार लग्ने केली.पहिले लग्न रूमा गुहा ठाकूरशी,दुसरे लग्न अभिनेत्री मधुबाला,तिसरे लग्न योगिता बाली,व चौथे लग्न त्या नावाजलेल्या लिना चंदावरकर या अभिनेत्री बरोबर झाले होते.
अमितकुमार या किशोरकुमारच्या मुलानेही गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.किशोरकुमारने अभिनय व गायनाचे कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचे शिक्षण वा धडे घेतले नव्हते.पण तरीही एक अष्टपैलू गायक,अव्दितीय गायक,संगितकार,अभिनेता,लेखक,दिग्दर्शक अशा विविध भूमिका पार पाडल्या होत्या.किशोरकुमार म्हणजे एक आगळा वेगळा कलावंत.किशोरकुमार यांनी ' शिकारी 'या हिंदी चित्रपटापासून अभिनेता म्हणून चित्रपट जगतात पाऊल ठेवले होते.
त्या काळी राजेश खन्नाला सुपरस्टार बनविण्यात गायक किशोरकुमारचा सहभाग असल्याचे सर्वत्र बोलले जात होते.आराधना मधील राजेश खन्नासाठी किशोरकुमारने सर्व गाणी गायली आणि राजेश खन्ना रातोरात सुपरस्टार झाला.याबाबत राजेश खन्नाचेही दुमत नव्हते.तसेच ' हाथी मेरे साथी ' ,' कटीपतंग ','सच्चाझूठा ','अपना देश ','सफर ','मेरे जीवन साथी ',' दुश्मन','अंदाज ','मर्यादा ','आप की कसम 'वगैरे वगैरे चित्रपटात किशोरकुमारनी राजेश खन्नासाठी गाणी गायली.किशोरकुमार स्वत: दिग्दर्शन,संगीत,लेखन,अभिनय अशा अनेक क्षेत्रात वावरला असला तरी गायन क्षेत्रात त्याला जास्तीत जास्त प्रसिध्दी मिळाली.
' दुखी मन मेरे सुन मेरा कहना,
जहा नही चैना,वहा नही रहना.'
' छोटीसी यह दुनिया पहचाने रास्ते है,तुम कही तो मिलोगे तो पुछेंगे हाल '
' जिंदगी एक सफर है सुहाना,
यहा कल क्या हो,किसने जाना.'
' समझोता गमोंसे करलो,जिंदगीमें गम भी मिलते है.'
' मुसाफिर हूँ यारो,ना घर है ना ठिकाना '
' गाडी बुला रही है,शिटी बजा रही है,'' गीत गाताहूँ मै '' मेरी प्यारी बहनियाँ '' प्यार दिवाना होता है,मस्ताना होता है' 'फुलों का तारोंका सबका कहना है ' 'रात कली एक ख्याब में आय़ी ओर गले का हार हुई.' ,'मेरे दिलने तडप के जब नाम तेरा पुकारा ' 'तेरी दुनियासे होगे मजबूर चला ' 'पल पल दिल के पास तुम रहती हो ' ,'रोते हुए आते है सब हँसता हुआ जो आएगा .' ,'रूप तेरा मस्ताना , ' 'मेरे सपनों की राऩी कब आयेगी तू ' ,'वादा तेरा वादा ' ,' हाल क्या है जनाब ना पूछो सनम आप का मुस्कुराना गजब ढा गया जिंदगी का सफर है यह कैसा सफर,' ' जिंदगी के सफरमें जो गुजर जाते है जो मकाम वो फिर नही आते.' ' चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना, '
अशा प्रकारची गाणी गाऊन जना मनात लोकप्रिय करून गायन क्षेत्रात किशोरकुमारने आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे,बंगाली,हिंदी,मराठी,गुजराती,कन्नड अशा विविध भाषेत किशोरकुमारनी गाणी गायली,अशा महान कलाकारास मनापासून अभिवादन
रिपोर्टर