
डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीत मोठा स्फोट; डोंबिवली हादरली घाबरून लोक रस्त्यावर आली डोंबिवलीत भीतीचे वातावरण
- by Reporter
- Aug 03, 2020
- 715 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील फेस २ मधील अंबर केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या स्फोटाने पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी परिसर हादरून गेला आहे. यामध्ये कोणाला दुखापत झाल्याबाबत अद्याप तरी माहिती समोर आलेली नाहीये. मात्र स्फोटाच्या हादऱ्यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रोबेस कंपनीच्या परिसरातील कंपनीमध्ये हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. यामध्ये कोणाला दुखापत झाली किंवा नाही याबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नसून शेजारील कंपनीचे नुकसान झाल्याचे समजते आहे. तर कंपनीतील रिऍक्टरच्या गॅसकेटचे तुकडेही शेजारील।इमारतींमध्ये जाऊन पडल्याची माहिती स्थानिकांनी
रिपोर्टर