
भांडूपकर कोरोनाबाधितांना रुग्णालयात जावून फळांचे वाटप
- by Reporter
- Aug 03, 2020
- 891 views
मुलुंड (शेखर भोसले) : भांडुपकर माजी शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, प्रताप कांबळे आणि गणपत खांडेकर यांच्या सौजन्याने
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भांडुप मधील टेंबीपाडा, लोकमान्य नगर, शिवाजी नगर, सर्वोदय नगर, टेंबीपाडा पाईप लाईन पलिकडील विभाग, खिंडीपाडा या विभागातील कोरोनाबाधित रुग्णांना कर्वेनगर, कांजूरमार्ग (पूर्व) आणि हिरनंदानी, पवई येथील विलगिकरण कक्षात जाऊन उकडलेली अंडी, फळे, बिस्किटे इत्यादी स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी सुरेंद्र (राजन) गावडे, मोहन कांबळी, अमित पडते, गणपत खांडेकर, सुधीर कदम, संतोष पाटील,
मिनल कांबळी, जयु म्हाञे, निलेश राणे, विरेंद्र कदम उपस्थित होते.
रिपोर्टर