
मुंबई धावती ठेवणाऱ्या पेट्रोल पंप कामगारांना काँग्रेस तर्फे मोफत अन्नधान्याचे वाटप
- by Reporter
- Aug 03, 2020
- 673 views
मुंबई (मिलिंद कारेकर) : कोरोना आजाराच्या संकट काळात गेली चार महिने आपली व आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल व गॅस भरुन मुंबई धावती ठेवण्याचे काम करणा-या पेट्रोल पंप कामगारांना अर्थात ख-या कोरोना योद्ध्यांना विभागीय काँग्रेस नेत्या, दक्षिण मुंबई महिला काँग्रेस माजी अध्यक्षा व मुंबई महिला काँग्रेस महासचिव मा स्मिता चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व काँग्रेस परिवाराच्या वतीने मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित मुंबई महिला काँग्रेस महासचिव मा.स्मिता चौधरी,संध्या शिंदे (महिला वाॅर्ड अध्यक्षा) व कार्यकर्ते, शिवडी तालुका काँग्रेस अध्यक्ष वाॅर्ड क्र.२०५ गोरख कांगणे,रवी पालवे उपस्थित होते
रिपोर्टर