डोंबिवलीच्या कोव्हिड सेंटरमध्ये रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा

डोंबिवली (श्रीराम कांदू) : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा एक मंगलमय दिवस. या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भाऊरायाला राखी बांधून त्याच्या दिर्घायुष्याची कामना करते. परंतु कोरोना साथीच्या आजच्या आपत्‍कालिन परिस्थितीत कोरोना बाधित असणारे अनेक जण रक्षाबंधनाच्या या पवित्र सोहळ्यापासून वंचित राहणार हे लक्षात येताच कल्याण-शिळ मार्गावरील दावडी रोडला असलेल्या पाटीदार भवनातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कोव्हिड योध्यांनी, तसेच तेथिल परिचारिकांनी ॲडमिट असलेल्या रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण अनोख्या पध्दतीने साजरा केला. याप्रसंगी रुग्णालयात दाखल असल्यामुळे बहिणीच्या भेटीपासून वंचित असलेले रुग्ण या सोहळ्यामुळे भारावून गेले. कोरोना विरुध्द लढायला आम्हाला आता पॉझिटीव्ह एनर्जी मिळाल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच महापालिकेच्या टाटा आमंत्रा व साई निर्वाण येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये देखील अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

संबंधित पोस्ट