सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लहुजी संघर्ष सेनेचे अभिवादन .

उल्हासनगर / प्रतिनिधी : जगतविख्यात साहित्यीक सत्यशोधक  अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी १०० व्या जयंती निमित्त  अण्णाभाऊ साठे क्रिडांगण उल्हासनगर ५ या ठिकाणी पुतळा स्मारकाला पुष्पमाला अर्पण करुण अभिवादन करण्यात  आले या प्रसंगी लहुजी संघर्ष सेना महासचिव तथा अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक समिती महासचिव दिपक सोनोने यानी अण्णाभाऊ साठे याना अभिवादन करुन  महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणूण शिफारस केली आहे परंतू अद्याप पर्यंत केंद्र सरकारने दखल घेतली नाही .  तथा अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यातल्या अनेक खासदार आमदार यांनी सरकार कडे विनंती पत्र दिले आहेत की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा तरी मा.प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतीकडे शिफारस करावी . आणि   १५ आगष्ट  अगोदर  अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहिर करावा अशी मांगणी केली .  या प्रसंगी पुतळा स्मारक समिती उपाध्यक्ष परशूराम लोंढे लहुजी संघर्ष सेना संघटक समाधान अंभोरे.  उत्तम चौथमोल.  रवि सोनोने.  शंकर लोखंडे.  विजय सोमनकर.  किशोर चौथमोल.  राजू  ससाणे.  डिगंबर सुरडकर.  अनिल धूळे . संदीप शिंदे.  ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट