महाराष्ट्रात उच्चांकी 10 हजार रुग्णांना डिस्चार्ज, मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता
- by Adarsh Maharashtra
- Aug 01, 2020
- 1225 views
मुंबई 1 ऑगस्ट: महाराष्ट्रात आज तब्बल 10 हजार कोरोना रुग्णांना 24 तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 9,601 रुग्ण सापडले. तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली असून आज 322 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृत्यूची संख्या ही 15,316वर गेली असून एकूण रुग्ण 4,31,719 एवढे झाले आहेत. राज्यात 1,49,214 रुग्ण आहेत त्यातले 46,345 रुग्ण हे पुण्यात आहेत. मुंबईत 1,059 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला. शहरात 20,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6,395 एवढा झालाय.
दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर नियंत्रित राखण्यात यश मिळ्याल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला होता. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत भारतीय व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा मृत्यूदर हा 2.15 टक्के असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताला लागणाऱ्या व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी असल्याने निर्यातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भारताचे व्हेंटिलेटर्स हे विदेशात कोरोना रुग्णांचे प्राण वाचविणार आहे.
देशात आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. देशासाठी ही दिलासा देणारी गोष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशाचा रिकव्हरी रेट हा 64.5 टक्के असून पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे 33.27 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.15 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशातल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केवळ 0.28 टक्के रुग्णच हे व्हेंटिलेटर्सवर आहेत.
देशात 1.61 रुग्णांना ICU ची गरज आहे. तर 2.32 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता. ही संख्या आटोक्यात राहावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या राज्यांना आत्तापर्यंत 268.25 लाख N 95 मास्क, 120.40 लाख पीपीई किट आणि 1083.77 लाख HCQच्या गोळ्यांचा पुरवढा केल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम