
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे मुंबई प्रदेश विभाग आयोजित स्पर्धा क्रमांक चार
- by Adarsh Maharashtra
- Aug 01, 2020
- 1326 views
मुंबई:(सुभाष जैन): अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे या नामांकित संस्थेच्या मुंबई प्रदेश विभागातर्फे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कवी शरद गोरे यांच्या आदेशा नुसार आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट
यांच्या मार्गदर्शनानुसार भव्य दिव्य देशभक्ती वर राज्यस्तरीय online स्पर्धा संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त आयोजित केली आहे , यानिमित्त खाली नमूद केल्याप्रमाणे रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येतील
प्रथम क्रमांक--५०००द्वितीय क्रमांक--३०००
तृतीय क्रमांक-- २०००,उत्तेजनार्थ-- १००० ( उत्तेजनार्थ तीन निवडण्यात येतील )
विषय: देशभक्ती
स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे
१)स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर स्वरचित कविता सादरीकरणाचा व्हिडीयो बनवून पाठवायचा आहे विडिओ कमीत कमी ३ ते चार मिनिटांचा हवा, त्या अधिक असेल तर स्पर्धेतून बाद केला जाईल
२)स्पर्धेला वयाचे बंधन नाही
३)स्पर्धेची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२० आहे, त्यानंतर येणाऱ्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत
४)स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच नाताळच्या आसपास वसई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे,पण स्पर्धकांनी व विजेत्यांनी सम्मेलनस्थळी वेळेवर सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे ( सम्मेलनाची निमंत्रण पत्रिका वाटसपवरून आठ दिवस आधी पाठविण्यात येईल )
५)स्पर्धेसाठी खालील तज्ञ मान्यवरांची परीक्षक निवड समिती गठीत केली आहे.
परीक्षक समिती
१)जेष्ठ - कवयित्रीं ललिता गवांदे ( ठाणे )
२)कवी- मधुकर भोये ( जव्हार )
३)शिक्षिका- उषा चौधरी- सातपुते( नाशिक )
४) कवी -आनंदकुमार शेंडे (यवतमाळ वणी )
५) प्राचार्या - रेखा दीक्षित ( कोल्हापूर )
६) समाजसेविका - सुरेखा साळुंखे ( पुणे )
७)कवयित्री- संगीता धोटे ( चंद्रपूर मारडा )
८)प्राचार्या- छाया भोसले ( औरंगाबाद )
९)कवी - राहुल शेंडे ( मोहोळ सोलापूर )
१०) कवयित्री- रंजना पाटील ( कल्याण )
६)कविता विडियो पाठविण्यापूर्वी खाली नमूद केलेल्या वाक्य सुरवातीला आले पाहिजे,,,,
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या स्वरचित काव्य स्पर्धेसाठी मी कवी/ कवयित्री-------------------- कविता सादर करीत आहे, कवितेचे नाव आहे----अमुक तमुक
७)निवड समितीचा निर्णय अंतिम राहील
८)निवड समितीला आणि आयोजकांना वारंवार फोन करून त्रास देऊ नये
९)स्पर्धेसाठी प्रवेशिका ५ ऑगस्ट २०२० पासून स्वीकारल्या जातील, स्पर्धेची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२०आहे
१०) स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
११)तरी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका दिनांक २५ ऑगस्ट २०२० पर्यंत खाली दिलेल्या कुठल्याही एका नंबरवर पाठवाव्यात, असे आयोजकांनी कळविले आहे.आयोजक समिती:
१)साहित्यिक राजू रणवीर ७०२१३३६९३३( डोंबिवली शहर उपाध्यक्ष )
२) कवी निलेश केरकर ८६५२५०५०५८
(डोंबिवली शहर सचिव )
३) कवयित्री सोनम ठाकूर ९८९०१३३५८४
( वसई शहर उपाध्यक्षा )असे कवी, पत्रकार सुभाष शांताराम जैन कळवितात.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम