अनिल आचरेकर यांचे निधन

मुंबई(प्रतिनिधी) : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सेनानी कै.निळकंठ आचरेकर यांचे जेष्ठ पुत्र कै.अनिल आचरेकर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले जेष्ठ पत्रकार दीपक शिरवडकर यांचे ते मानस बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कल्पेश व योगेश हे दोन पुत्र,कन्या योगिता तसेच जावई,सून,नातू असा परिवार आहे.कै.अनिल आचरेकर यांच्या निधनानिमित्त माजी नगरसेवक बळवंतराव पवार,माडबन शिवसेना संपर्क प्रमुख प्रेमानंद तिवरकर,दै.आदर्श महाराष्ट्रचे संपादक रघुनाथ ढेकळे,मुंबादेवी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण ठाकूर, हरकचंद कोराणी,युवा सेनेचे कुणाल अधिकारी आदींनी शोक व्यक्त केला.रे रोड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत कै.अनिल यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित पोस्ट