कल्याणमध्ये गुन्हेगारी वर्चस्व तथा आर्थिक वादातून कुख्यात गुंडाची हत्या गोळ्या घालणाऱ्या शूटरांना शोधण्यासाठी ५ पथके रवाना

डोंबिवली (श्रीराम कांदू) : गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व तसेच आर्थिक वादातून कुख्यात गुंड मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याला दोघा शूटरांनी गोळीबार करून ठार केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नीलम गेस्ट हाऊसच्या गल्लीत शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडल्यानंतर या परिसरात तणावाचे वातावर पसरले आहे. पोलिसांची ५ पथके हल्लेखोरांना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत.
      
याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी कल्याणच्या अन्सारी चौकातील मदारछल्लामध्ये राहणाऱ्या अधुशहमा शब्बीर अन्सारी (३७) याच्या जबनीवरून फरार चौघांच्या विरोधात भादंवि कलम ३०२, ५०६ (२), ३४ सह भारतीय हत्यार कायदा ३, २५ महाराष्ट्र पोलिस कायदा ३७ (१), १३५ अनव्ये गुन्हा दाखल केला. धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा, त्याचा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान आणि दोन अनोखळी साथीदार अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
      
यातील तक्रारदार अधुशहमा शब्बीर अन्सारी हा २०११ पासून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तर जिग्नेश याचे कल्याण येथे किड्स वर्ल्ड नावाचे कपड्याचे दुकान, भिवंडी येथे मेडिकल स्टोअर्स, तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा येथे स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. तर धर्मेश उर्फ नन्नू शहा आणि जिग्नेश ठक्कर हे बालपणीचे मित्र असून या दोघांमध्ये सद्या आर्थिक व्यवहार तसेच गुन्हेगारी वर्चस्वावरून आपसात वाद सुरू झाले. तीनच दिवसांपूर्वी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शंकरराव चौकात गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शहाचा साथीदार चेतन पटेल आणि जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया यांच्यात हाणामारी झाली होती. शुक्रवारी रात्री सायंकाळी ५ च्या सुमारास जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया हा रात्री पावणेदहाच्या सुमारास त्याच्या कार्यालयातून बाहेर पडला. सद कार्यालयासमोरील सुयश प्लाझा बिल्डींगचे कोपऱ्यावर असलेल्या जनरेटर समोर फोनवर बोलत उभा असतानाच धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा व त्याचा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान असे दोघे जिग्नेश ठक्कर याचेजवळ आले आणि ते आपसांत काहीतरी बोलू लागले. इतक्यात धर्मेश शहा आणि त्याचा ड्रायव्हर जयपाल उर्फ जापान यांनी पिस्तुलमधून जिग्नेशवर गोळ्या झाडल्या. ४ ते ५ गोळ्या फायर केल्याने जिग्नेश कोसळला. हे पाहून अधुशहमा अन्सारी व अन्य काहीजण जिग्नेशच्या दिशेने धावले असता हल्लेखोर धर्मेश शहा आणि जापान या दोघांनी पिस्तुल रोखून कोई बीच मे आया तो ठोक देंगे, असे धमकावले. त्यानंतर धर्मेश शहा आणि जयपाल उर्फ जापान यांनी त्यांच्यासोबत आलेल्या आणखी 2 जणांसह कारसह तेथून पलायन केले. छाती व पोटात गोळ्या घुसल्याने जबर जखमी अवस्थेत पडलेल्या जिग्नेश ठक्कर याला कालीदास चव्हाण याच्या स्कुटरवरून फोर्टीस हॉस्पीटलमध्ये नेले. तथापी तेथिल डॉक्टरांनी जिग्नेशला मृत घोषित केले.
     
जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याला गोळ्या घालून ठार मारणाऱ्या फरार हल्लेखोर धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याच्याविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे १५ ते २० गुन्हे दाखल आहेत. तर मृत जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याच्याविरुध्द खंडणी, जबरी चोरी असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. धर्मेश शहा आणि जिग्नेश ठक्कर हे दोघेही खंडणीच्या एका गुन्ह्यात सहआरोपी आहेत. २९ जुलै रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शंकरराव चौकात धर्मेश उर्फ नन्नू नितिन शहाचा मित्र चेतन पटेल आणि जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया यांच्यात झालेल्या हाणामारीचे परस्परविरोधी गुन्हे बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जिग्नेश व धर्मेश शहा यांच्यात आर्थिक वाद, तसेच आधी झालेल्या हाणामारीच्या खुनशीतून जिग्नेश याचा गोळ्या झाडून त्याला ठार केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. फरार हल्लेखोरांना हुडकून काढण्यासाठी पोलिसांची 5 पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत.

संबंधित पोस्ट