रस्त्यावर भाकरी खाऊन वंचितने लॉकडाऊन तोडले..!

बीड (प्रतिनिधी) : राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावर बसून चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला गेला.

लॉकडाऊनने गोरगरिबांचं कंबरडे मोडल्याचे सांगत आजपासून शासनाचा कसलाच लॉकडाऊन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच रस्त्यावरच भाकरी खात लॉकडाऊन तोडण्यात आला. आज पासून कोणीही मास्क घालणार नाही, किंवा फिजिकल डिस्टन्स पाळणार नाही.
असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी जाहीर केले आहे. या प्रसंगी राज्य महासचिव भीमराव दळे प्रशांत बोराडे  सम्यकचे जिल्हाध्यक्ष अजय साबळे,  बाळासाहेब वाघमारे इत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट