
दूध दर वाढीच्या आंदोलनात उत्तर मुंबई जिल्हा रासप मैदानात.
- by Reporter
- Aug 01, 2020
- 678 views
मुंबई (भारत कवितके) : दूध दर वाढीच्या आंदोलनात उत्तर मुंबई जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष मैदानात उतरला आहे.महाराष्ट्र भर दूध दर वाढीच्या आंदोलनास १ आँगस्ट २०२० पासून तीव्र स्वरूप प्रात होत असताना दिसत आहे.माजी मंत्री महादेव जानकर यांनी पंढरपूर मध्ये चंद्रभागेत आपल्या कार्यकर्त्या सोबत पांडुरंगाच्या मूर्तीला दूधाचा आभिषेक घालून आंदोलन केले.या मध्ये पंकज देवकते,माहाळाप्पा खांडेकर,लवटे,सनगर वगैरे वगैरे रासप कार्यकर्त्ये सहभागी होते.या आंदोलनाचे संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत.दूध दर वाढीच्या आंदोलनात दहिसर पूर्व येथील महाराणी अहिल्याबाई होळकर चौकात उत्तर मुंबई जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षानी दूधाचा आभिषेक व गरीबांना मोफत दूध वाटप करून आंदोलन केले.या प्रसंगी उत्तर मुंबई जिल्हा तील जेष्ठ रासप नेते दत्ताजी पिराजी सुरनर,उत्तर मुंबई रासप जिल्हा अध्यक्ष संतोष ठावरे,महासचिव राम धारी पाल,प्रदीप पाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर