लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' करणार आरोग्योत्सव साजरा
- by Reporter
- Aug 01, 2020
- 1140 views
मुंबई (प्रतिनिधी) : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहित निर्णय घेतलांय. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या, लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षा कारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवदान देणार्या या 'आरोग्योत्सव' प्लाझ्मादान शिबिराचे ऊद्घाटन सोहळा जेष्ठ नेते मा. खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते सोमवार दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता लालबागचा राजा मार्ग, लालबाग मार्केट, मुंबई-१२ या ठीकाणी संपन्न होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या माहीती व संदर्भासाठी पाठवित आहे.
बाळासाहेब कांबळे.
अध्यक्ष,
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

रिपोर्टर