लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या,विनोद घोसाळकर यांची मागणी

मुंबई: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता १ ऑगस्ट २०२० रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारणात अण्णाभाऊ साठे यांचे उल्लेखनीय योगदान लक्षात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती,दहिसरचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे. मागास समाजातून पुढे आलेल्या अण्णाभाऊंनी वंचित समाजाच्या व्यथा- वेदना आपल्या शाहीरी व साहित्यकृतीतून अतिशय परिणामकारकरित्या मांडल्या आहेत. अशा थोर समाज समाज सुधारकास  भारतरत्न पुरस्कार मिळाल्यास त्यांच्या कार्याला साजेल असे कार्य घडणार आहे. दोन दिवसांपूर्वी दहिसर विधानसभा क्षेत्रातील मातंग समाजाच्या वतीने विष्णू वाघमारे, शशिकांत शिंदे, डॉ. विश्वनाथ गायकवाड, राम शिंदे, दत्तू टोकडे, संभाजी दलाले, रावसाहेब पारखे आदींसह हजारोंनी घोसाळकर यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे त्यानुसार अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन समस्त बहुजन समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी घोसाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित पोस्ट