
मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
- by Reporter
- Aug 01, 2020
- 1082 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोविड-१९चा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, अत्याश्यक सेवेसाठी विशेष रेल्वे सेवा सुरु आहे. मात्र, वाढणारी गर्दी लक्षात रेल्वे प्रशासनाने ‘क्यु-आर’ कोड प्रणाली लागू केली आहे. ‘क्यु-आर’ कोड पास असेल तरच अत्याश्यक सेवेत काम करणाऱ्यांना यापुढे लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी ३० जुलैची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून होणारा विलंब लक्षात घेता ही ‘क्यु-आर’ कोडची मुदतवाढ १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला ये - जा करण्यासाठी विशेष लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी ‘क्यु-आर’ कोडचा आधारित पास सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती एकत्र करण्यात राज्य सरकारकडून विलंब होत आहे. त्यामुळे सध्याच्या सुविधाप्रमाणे प्रवासास संधी देण्यात आली आहे. मात्र, १० दिवसानंतर क्यूआर कोड शिवाय प्रवास करता येणार नाही.
मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेरील अत्यावश्यक प्रवाशांसाठी हा 'क्यूआर कोड' पास बंधनकारक असणार आहे. त्यानुसार हा ‘क्यु-आर’ कोडबाबत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरु करण्याचे ठिकाण, कार्यालयाच्या वेळा आणि अन्य तपशील यांची माहिती एकत्र करण्याचे काम राज्य सरकारने सुरु केलेय. परंतु कमी कर्मचाऱ्यांमुळे हे काम त्वरीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने हा पास मिळेपर्यंत ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे.
रिपोर्टर