समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा साहित्यिक...अण्णाभाऊ साठे.

१ आँगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोक क्रांतीचे जनक अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला.जन्मापासून मरणापर्यत त्यांच्या जीवनात त्यांना संघर्षच करावा लागला संघर्षाविना त्यांचे जीवन नव्हते. पोवाड्यातून लावणीतून ,विचार मांडताना मर्यादा आड येत असल्याने त्यांनी आपले विचार कांदबरी कथा,नाटके,यातून मांडण्यास सुरूवात केली आणि समाजाला सर्व सामान्याना जगण्या साठी संघर्षाची जाणीव करून दिली विशेष करून त्यांनी कामगार वर्गाला एकत्रीत करून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा सुरू केला त्यामुळेच तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.हे केवळ अण्णाभाऊ साठे मुळेच अण्णाभाऊ साठे विद्रोही लेखक म्हणून ओळखले जायचे.मार्क्सवादा कडून आंबेडकरवादा कडे जेव्हा ते वळले त्यावेळी दलित वर्गाला अण्णाभाऊ साठे कळाले  आणि आंबेडकरवादी साहित्यात त्यांची दखल घेतली गेली.अण्णाभाऊनी सन १९४४/४५ साली ' कम्युनिस्ट कलापथक  स्थापन केले.पण ते त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचा कोणत्याही पदावर नव्हते.तसा कुठेही उल्लेख नसल्याचे आढळते.सन १९५७/५८ च्या दलित साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाच्या भाषणात ते म्हणाले होते,' पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर (फणावर)बसलेली नसून ती कष्टकरी,दीन दलित,आणि श्रमिकांच्या तळहातावर तरळत आहे.' गार्बी,लेनिन,कार्ल मार्क्स आणि आंबेडकर यांच्या विचारांचे धगधगते निखारे म्हणजेच अण्णाभाऊ साठेचे साहित्य होय सर्व सामान्याच्या पोटाची भूक भागविण्या साठी अण्णाभाऊनी आपल्या साहित्यातून स्वाभिमान जागा केला.सामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच त्यांनी आयुष्यभर खरा संघर्ष केला.अण्णाभाऊ खरतर खूपच कमी शिकलेले होते.पण त्यांची साहित्यसंपदा विपुल प्रमाणात होती.त्यांच्या साहित्याचा विषयच समाज परिवर्तनाचा असायचा.११ लोकनाट्ये,३ नाटके,७ चित्रपट कथा,३५ कांदबऱ्या,१९ कथासंग्रह इतके प्रचंड प्रमाणात साहित्य त्यांच्या कडून निर्माण झाले.त्यांची प्रत्येक कांदबरी जनमनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही त्यापैकी ' माकडीचा माळ ','वारणेचा वाघ 'फकिरा ' व ' मास्तर 'या त्यांच्या कांदबऱ्या प्रचंड गाजल्या.त्यांच्या कांदबर्यावरून चित्रपटही निघाले .मुंबई शहराचे वर्णन करणारी लावणी पहा ..

मुंबई उंचावरी/मलबार हिल इंद्रपुरी

कुबेराची वस्ती तिथ सुख भोगती

परळात राहणारे/ रात दिवस राबणारे

मिळेल ते खाऊनी घाम गाळती

ग्रँट रोड,गोखले रोड

संडास रोड,विन्सेंट रोड

असे किती रोड इथं नाही गणती

गल्ली बोळ किती आत 

नाक्याचा नाही अंत

अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती

आगीनगाडी,मोटारगाडी

विमान घेत उंच उडी

टांग्याची घोडी मरती रस्त्यावरती

हातगाडी हमालांची

भारी गडबड खटार्याची

धडपड इथं वाहतुकीची रीघ लागती

दुसरी लावणी...

माझी मैना गावावर राहिली

माझ्या जिवाचि होतिया काहिली

ओतीव बांधा/रंग गव्हाला

कोर चंद्राची/ उदात्त गुणाची

मोठ्या मनाची/ सीता ती माझी रामाची

हसून बोलायची/ मंद चालायची

सुगंध केतकी/सतेज कांती

घडीव पुतली सोन्याची/ नव्या नवतीची

काडी दवण्याची

रेखीव भुवया/ कमान जणू इंद्रधनुची

हिरकणी हिरयाची......

अशा अनेक लावण्या अण्णाभाऊनी लिहील्या.

१७ जुलै १९६९ रोजी अण्णाभाऊ साठे आपल्या मानधनासाठी वणवण करून घरी आले,ते खूपच निराश होते,संध्याकाळी झोपले व १८ जुलै १९६९ रोजी झोपेतच त्यांचे निधन झाले.लोकक्रांतीचे जनक म्हणजेच अण्णाभाऊ साठे,यांना कोटी कोटी आदरांजली...

भारत कवितके ,मुंबई कांदिवली,मोबा.८६५२३०५७००

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट