विद्यार्थी भारतीने केली आज पहाटे चार वाजता प्रधानमंत्री मोदींची काकड आरती

पदवी पदव्युत्तर परिक्षेची सक्ती रद्द करण्या साठी करावी अमेंडमेंड

डोंबिवली (श्रीराम कांदू) : मंजिरी धुरींच्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात पहाटे ०४:००  वाजता युजीसी व मोदींच्या काकड आरतीने झाली .  "मोदी व युजीसीचं डोकं ठिकाण्यावर येऊ दे रे महाराजा" अश्या घोषवाक्यांनी कार्यकर्त्यांनी आरतीची सुरुवात केली व मोदींना व युजीसीला जाग यावी यासाठी आरती करत पुन्हा एकदा परीक्षा रद्द करण्यासाठी आव्हान केले.

त्यानंतर पहाटे ०५:०० वाजता मंजिरी ताई उपोषणाला स्थानापन्न झाल्या तेव्हा छत्रशक्ती संस्थेच्या सेक्रेटरी स्मिता ताई साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीतील भाषणात त्यांनी  युजीसी व मोदींच्या बेजबाबदार पणाचा विरोध करत न्यू एज्युकेशन पॉलिसी चा विरोध केला व उपोषणाला बसलेल्या मंजिरी धुरीच्या धाडसाचे  कौतुक केले.

विद्यार्थी भारती राष्ट्रीय संघटक शुभम राऊत तसेच विद्यार्थी भारती राज्य संघटक सिद्धार्थ कांबळे यांनी मंजिरी धुरींच्या उपोषणाला पाठिंबा देत आज साखळी उपोषण केले आहे.

त्यानंतर आज उपोषणाचा तिसरा दिवस असला तरीही माझी ताकद कमी  झालेली नसून विद्यार्थ्यांचा वाढता पाठिंबा माझी ताकदही वाढवत आहे. तसेच मोदींना राफेल आणि अयोध्ये इतकाच विद्यार्थ्यांचा विषय का महत्वाचा वाटत नाही? जे विद्यार्थी उद्याच्या देशाचे भविष्य आहेत.  त्यांच्या विषयी एकही वक्तव्य न करता त्यांच्या जीवावर टांगती तलवार ठेवणं हे धिक्कारस्पद आहे. तसेच काल विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी ट्विटर व फेसबुक live  च्या माध्यमातून बोंबा मारो आंदोलन करून सरकार ला जाग आणण्याचा प्रयत्न केला , आज पहाटे काकड आरती केली . आणि अश्या अनेक गोष्टी करत राहू पण वटहुकूम काढून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण जीव गेला तरीही नाही थांबणार असे मंजिरी धुरी यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट