ठेकरदाराकडून कामाचा दिखावा करून रेल्वेची लूट
- by Reporter
- Jul 29, 2020
- 897 views
घाटकोपर (प्रतिनिधी) : कामाचा दिखावा करून थातूरमातूर काम करणाऱ्या ठेकेदारांकडून रेल्वेची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. सेंट्रल रेल्वेच्या घाटकोपर स्थानकाजवळ रेल्वेच्या हद्दीतील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी व रेल्वे रुळा जवळील साफसफाई करण्यासाठी ठेकेदारांना कामाचा ठेका दिला जातो. मात्र सदरचे ठेकेदार फक्त फोटो काढण्यापुरते कामगारांना कामाच्या ठिकाणी उभे करून काम केल्याचा दिखावा करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी सीआयएसबी या कंपनीला सदर कामाचा ठेका दिल्याचे सांगण्यात येत असून या कंपनीचे सुपरवायझर संगनमताने फक्त कामाचा दिखावा करून रेल्वे प्रशासनाची लूट करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रिपोर्टर