दहावीच्या निकालात कोकणची बाजी

डोंबिवली (श्रीराम कांदू) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के  लागला आहे. मुंबईचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९६.११ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. यंदा परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

संबंधित पोस्ट