
करोना साथीत नागरिकांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना ५० लाखाचा विमा संरक्षण द्या !
डॉ. विवेकानंद जाजू यांची सरकारकडे मागणी
- by Reporter
- Jul 29, 2020
- 1013 views
मुंबई (प्रतिनिधी) : स्वतःचा जीव धोक्यात घालून करोना साथीत नागरिकांना वैद्यकीय उपचार सेवा देणाऱ्या सर्वच डॉक्टरांना ५० लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावा, अशी मागणी नॅशनल इंट्रीग्रेट मेडिकल असोसिएशन (निमा) तर्फे डॉ. विवेकानंद जाजू यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे शिवसेना नेते अनिल परब यांच्या माध्यमातून केली आहे. सोबत करोना झालेल्या डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंब सदस्यांना चांगल्या रुग्णालयात काही खाटा राखीव ठेवण्यात यावा, अशाही मागण्या डॉ. जाजू यांनी केल्या आहेत.
राज्यात करोना साथ सुरू झाल्यापासून काही सेवाभावी डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता आपला दवाखाना सुरु ठेवून नागरिकांना डायबिटिस, बीपी, सर्दी-खोकला सारख्या आजारांबाबत उपचार सेवा देत आहेत. अशात काही डॉक्टरांना करोनाची लागण होऊन त्याच्या उपचारात हयगय झाल्याने मृत्यूही झाला आहे. आजही अशाप्रकारे सेवा देताना करोना झालेल्या डॉक्टरांना चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी प्राध्यान्य दिले जात नाही. केवळ थाली आणि टाळी वाजवून संरक्षण मिळणार नाही. त्यासाठी सरकारने मोठ्या मनाने आरोग्य सेवा देणाऱ्या सर्वच डॉक्टरांना ५० लाखाचा आरोग्य विमा जाहीर करावा, अशी मागणी डॉक्टरांच्या निमा संघटनेच्या माध्यमातून डॉ. जाजू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री दिलीप टोपे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात डॉ. जाजू यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली असल्याचे सांगितले.
रिपोर्टर