मागील २४ तासात ७ हजार ७१७ कोरोना रुग्णांची नोंद, तर २८२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई, २८ जुलै :महाराष्ट्रात १० हजार ३३३ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७१७ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ५९.३४ टक्के इतका झाला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये २८२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर ३.६२ टक्के झाला आहे.

राज्यात आज 7717कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 391440 अशी झाली आहे. आज नवीन 10333 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 232277 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 144694 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या १ लाखांच्या पुढे गेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ६८ दिवसांवर आला आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईकरांची हर्ड इम्युनिटी वाढल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.मुंबई महानगरपालिका, नीती आयोग आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं शहरात सेरो चाचणी केली. त्यातील पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी आणि इतर भागांमधील ६ हजार ९३६ जणांचे अहवाल घेण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली. झोपडपट्टी भागातील ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. तर इतर भागातील १६ टक्के व्यक्तींच्या शरीरात आढळल्या आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट