तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करीत असताना हेल्परचा मुत्यू घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

डोंबिवली : (श्रीराम कांदू)  पूर्वेकडील एमआयडीसी फेस 2 मधील नवजीवन डाईंग कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या ओमकार गुप्ता (36) हा कंपनीत मंगळवारी रोजी तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करीत असताना तोल जावून खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 

ओमकार गुप्ता हा फेज 2 मधील विकास नाक्यावरील नवजीवन डाईंग या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत हेल्पर म्हणून नोकरी करतो. ओमकार हा सदर कंपनीच शिप्टवाईज किंवा ओव्हरटाईम म्हणून सदर कंपनीमध्ये काम करतो. रविवारी रात्री 8 च्या सुमारास ओमकार कामावर गेला होता. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास ओमकार हा कंपनीमध्ये काम करत असताना तिसऱ्या माळ्यावर लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करत असताना त्याचा तोल जाऊन तो पडून त्यास मार लागला असल्याने त्याला उपचाराकरीता शिवम हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात त्याचा भाऊ लवकुश याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट