उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कांजूरमार्ग येथे विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

कांजूर मार्ग (शेखर भोसले) : शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांच्यावतीने पालिकेच्या साहाय्याने कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मोफत आरोग्य शिबीर शाखाप्रमुख इंद्रजित गवस (प्रभू) यांच्या सहकार्याने कांजूर मार्ग पूर्व येथील शिवसेना शाखा क्र ११७ येथे आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात कोरोणा संशयित रुग्णांची तपासणी तसेच सर्दी, ताप, खोकला, इत्यादी सामान्य आजाराने आजारी असलेल्यांची तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधं देण्यात आली.

तसेच यावेळी सामान्य नागरिकांना मोफत सॅनिटाइझर वाटप, आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपथी औषधांच्या गोळ्याचे वाटप, छत्री वाटप, इत्यादी सामाजिक कार्याचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.

यावेळी आमदार सुनिल राऊत, आमदार रमेश कोरगावकर, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप राऊत, विधानसभा संघटक संदीप सावंत, उपविभागप्रमुख अनंत पातडे, सिद्धी जाधव, इत्यादी पदाधिकारी, उपशाखाप्रमुख व महिला आणि पुरुष शिवसैनिक उपस्थित होते

संबंधित पोस्ट