भाजपला मोठा धक्का देत नारायण राणे यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी हाती घेतला शिवसेनेचा भगवा झेंडा

तर यापुढे शिवसेना संघटना वाढवण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार : विकास कुडाळकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
       
कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,गटनेते नागेंद्र परब, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,रुची राऊत ,गितेश राऊत, अशा मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ओरोस येथील खासदार कार्यालयात आज सोमवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम  पार पडला. खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत, आ.वैभव नाईक यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब यांच्या साथीने  कुडाळ तालुक्यासह अन्य ठिकाणी यापुढे शिवसेना संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचे यावेळी कुडाळकर यांनी सांगितले. कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव कमी होताच समर्थक कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम सुध्दा घेण्यात येईल असे यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.

दि. १७ जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी विकास कुडाळकर यांची त्यांच्या घरी जावुन सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतर कुडाळकर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला होता. कुडाळकर हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राणेंच्या गोठात खळबळ उडाली असुन लवकरचं तालुक्यातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन कुडाळकर यांनी केले आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नारायण राणे यांचे खंदे समर्थक श्री विकास भाई कुडाळकर यांचा पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज माननीय खासदार श्री विनायकजी राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला ते बरेच दिवस नाराज होते ज्या पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय  कारकिर्दीची सुरवात केली व अनेक पदे भूषवली होती.यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख श्री.संजयजी पडते,जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत,जि .प गटनेते तथा जि .प .सदस्य श्री.नागेंद्र परब, तालुका प्रमुख श्री.राजन नाईक ,रुची राऊत ,गितेश राऊत हे उपस्थित होते.


संबंधित पोस्ट