मानखुर्द बालसुधारगृहातील ३०० मुले आणि कर्मचा-यांची १०० टक्के स्वॅब टेस्टिंग करा! भाजप नेते किरीट सोमैया यांची मुंबई महापालिकेकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : मानखुर्द बालसुधारगृहातील जवळजवळ ३५० मुलांपैकी ३० मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.  एकूण ५४ मुलांची स्वॅब टेस्टिंग कऱण्यात आली होती त्यापैकी ३० मुलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणे हे खरोखरचं धक्कादायक असून, बीएमसीने या सुधारगृहातील सर्व मुलांची आणि कर्मचा-यांची १०० टक्के स्वॅब टेस्टिंग करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.


यातील २७ मुलांनी बीकेसी कोवीड सेंटर इथं, तर ३ मुलांना सायन रुग्णालयात एडमिट करण्यात आले आहे.

आज सोमैया यांनी मानखुर्द बालसुधारगृहाची भेट घेतली आणि कर्मचा-यांशी चर्चा केली. येथील कर्मचा-यांना गेल्या ४ महिन्यापांसून पगारही मिळालेला नाही. इथे गतिमंद आणि इतर मुलांसाठी अशी दोन सुधारगृह आहेत.

यावेळी नगरसेवक बबलु पांचाळ आणि युवराज मोरे आणि अनिल ठाकूर,  सोमैया यांच्यासोबत होते.

संबंधित पोस्ट