उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंड मध्ये रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप

मुलुंड (शेखर भोसले) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंड पूर्व येथील शिवसेना शाखा क्र १०६ च्या वतीने पालिकेच्या वीर सावरकर रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व रुग्णांना भेटून त्यांना तब्येतीची काळजी घेण्याच्या व आजारपणातून लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपविभागप्रमुख महेंद्र वैती, विधानसभा संघटक नितीन सावंत, शाखाप्रमुख अमोल संसारे, प्रविण सावंत, महेश विचारे, एकनाथ मालवणकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट