परत मातोश्रीत सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह
- by Reporter
- Jul 25, 2020
- 535 views
मुंबई (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांंच्या मातोश्री या निवासस्थानी कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याआधी तेजस उद्धव ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मातोश्रीवर सध्या चिंतेचे वातावरण आहे.
तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मरोळ येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच तेजस ठाकरे यांच्या इतर सुरक्षारक्षकांचीही तपासणी करण्यात आली आहे. मात्र, तेजस ठाकरे अनेक दिवस घराबाहेर पडलेले नव्हते. त्यामुळे त्यांना कोणताही धोका नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, आता रश्मी उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता वाढली आहे. याआधी देखील मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडणे शक्यतो टाळत आहेत. मात्र, याच कारणामुळे ते सध्या विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आपल्या मुलाखतीतून चोख उत्तर दिले आहे.
रिपोर्टर