उद्या पासुन कोरोना रुग्णांसाठी पालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी नवीन रुग्णसेवांकेंद्रांचा होत आहे शुभारंभ !

डोंबिवली (श्रीराम कांदू) : कल्याण- डोंबिवलीत उदया दुपारी १२.३० वाजता ना. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे शुभहस्ते पाटीदार भवन व आसरा फाऊंडेशन येथे कोव्हिड रुग्णांसाठी समर्पित आरोग्य केंद्र, त्याच प्रमाणे गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांचा ऑनलाईन शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे.

डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी लकडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + ४  मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे ५००० स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत ७० बेड त्यापैकी ६० ऑक्सिजन सुविधा असलेले व १० सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारे डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-या मजल्यावरती ५००० स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले ७० बेड व ४ थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले ७० बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणाव रहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात १ रुपी क्लिनीक डॉ. प्रशांत घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण २ एमडी फिजीशियन, २५ निवासी डॉक्टर ,५० परिचारिका व ३० हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोव्हिड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये १०० ऑक्सिजनचे बेड, ८४ नार्मल बेड ,१० सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटर मध्ये १२ डॉक्टरर्स, २० नर्सेस, २० वॉर्ड बॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील.

कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज ३००० चाचण्या होवू शकतात.

संबंधित पोस्ट