महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण, लीलावती इस्पितळात दाखल
- by Adarsh Maharashtra
- Jul 23, 2020
- 813 views
मुंबई, २३ जुलै : मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांची दैनंदिन रुग्ण वाढीने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.
याचबरोबर राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत करोनामुक्त झालेले १ लाख ८७ हजार ७६९ जण व करोनामुळे मृत्यू झालेल्या १२ हजार ५५६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांसोबत राजकारणी देखील मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आपण घरातच उपचार घेत असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्रास जाणवू लागल्यामुळे अधिक उपचारासाठी लीलावतीमध्ये दाखल झाल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, माझी प्रकृती चांगली आहे. थोडा त्रास जाणवत होता म्हणून लीलावती रूग्णालय मुंबई येथे दाखल झालो आहे, चिंता नसावी.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम