एन-९५ मास्क कोरोना रोखू शकत नाही, तर मास्कच्या विक्रीस कोणाची परवानगी?

मुंबई (दीपक शिरवडकर) : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याकरता व इतरांना संसर्ग होऊ नये याकरता मास्कचा वापर केला जात आहे. वेगवेगळ्या रंगातील वॉल्व्ह असलेले आकर्षक मास्क सद्या बाजारात सहजपणे मिळत आहेत व लाखोंच्या घरात ते विकलेही गेले आहेत. डॉक्टर,आरोग्य अधिकारी हे मास्क वापरतात, आता ते सर्वसामान्यही वापरत आहेत.

असे असताना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ.राजीव गर्ग सांगतात की एन-९५ मास्कमुळे कोरोना संसर्ग रोखण्याचा मुख्य उद्देश पूर्ण होत नाही. या मास्कचा वापर बंद करावा अशा सूचनाही आता केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केल्या आहेत. प्रश्न पडतो की एन-९५ मास्क जर घातक आहे तर असे मास्क बाजारात विक्रीलाच कसे आले.विविध कंपन्यानी हे मास्क बाजारात आणण्यापूर्वी शासकीय यंत्रणेची आरोग्य विभागाची परवानगी घेतली असणारच ना! तेव्हा खुल्या बाजारात असे घातक मास्क विक्री करण्यास कोणी परवानगी दिली? आज अशा एन-९५ मास्कने लाखो करोडोची उलाढाल केल्यानंतर हे मास्क कोरोना रोखू शकत नाहीत असा साक्षात्कार सरकारी आरोग्य संघटनांना व्हावा हे जरा विचित्रच वाटते एन-९५ मास्कचे वितरन करणाऱ्या कंपन्या कोठे कमी पडल्या .त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेले एन-९५ मास्क घातक वाटू लागले.याबाबत सर्वसामान्य संशंय व्यक्त करीत आहेत.

संबंधित पोस्ट